ट्रक पटली होवुन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:54 IST2021-05-18T21:51:34+5:302021-05-19T00:54:40+5:30
लोहोणेर : ठेंगोडा येथे मंगळवारी (दि.१८) दुपारी बसस्थानक जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक पादचारी ट्रकखाली दबल्याने मरण पावला.

ट्रक पटली होवुन एकाचा मृत्यू
लोहोणेर : ठेंगोडा येथे मंगळवारी (दि.१८) दुपारी बसस्थानक जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक पादचारी ट्रकखाली दबल्याने मरण पावला.
देवळ्याकडून सटाण्याकडे भरधाव जाणारी मालवाहु ट्रक (एम एच १२ - डिटी- ६८२४) अचानक ठेंगोडा बस स्थानक समोर पलटी होवुन रस्त्याच्या बाजुने पायी चालत जाणारे करिम रज्जाक जामकर (५०) रा.घोडमाळ पिंपळनेर ता. साक्री. जि. धुळे. (हल्ली मुक्काम दरहाने फाटा ) यांच्या अंगावर पलटी होवुन त्यांचे पाय गाडीखाली अडकल्याने मोठी दुखापत झाली. त्यांना काहीवेळा नंतर गाडीखालुन काढुन सटाणा ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र ते मयत झाल्याचे कळविण्यात आले.
ट्रक चालक तेथुन पळुन गेल्याने अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध सटाणा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाजन, ठाणे अंमलदार विलास मोरे, सांळुके हे करत आहेत.
ट्रक पलटी होऊन मोठा आवाज झाल्याने सदर कोरोनामुळे बसस्थानकाजवळ गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रोजच या परिसरात वर्दळ असते.
(१८ ॲक्सीडेंट)
ठेंगोडा येथे अपघाताग्रस्त पलटी झालेला ट्रक.