दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 09:51 PM2021-03-10T21:51:21+5:302021-03-11T01:25:41+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून एकाच आठवड्यात गोंदे दुमाला ते वाडिव-हे दरम्यान ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून एकाच आठवड्यात गोंदे दुमाला ते वाडिव-हे दरम्यान झालेल्या अपघातात झालेल्या अपघातांत आत्तापर्यंत पाच जण ठार झाल्याच्या घटना ताजी असतांनाच मंगळवारी रात्री ९:३०च्या सुमारास कुऱ्हेगाव जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला.
दुसरी घटना नाशिक-मुंबई या महामार्गावर असलेल्या गोंदे दुमाला येथील लियर कंपनीजवळ घडली असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. गोंदे दुमालाहून अस्वलीकडे जात असतांना मोटारसायकल क्रमांक (नवीन गाडी नंबर नाही) या मोटारसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कुऱ्हेगाव येथे वळण घेत असतांना दुचाकीस्वार बाजूच्या असलेल्या शेतीत जवळपास २० फुट खोल असलेल्या ठिकाणी पडल्यामुळे या झालेल्या अपघातात राहुल कैलास सोनवणे (३०, रा.परधडी चाळीसगाव) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश सुभाष सोनवणे (२२, रा. रावळगाव मालेगाव) या जखमी झालेल्या तरुणावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना मोटरसायकल क्रमांक (एमएच १५, जीयू ५२३३) या दुचाकीस्वाराने समोरच उभ्या असलेल्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात चालक सुभाष बाबुराव चव्हाण (४७, रा.बेझे, त्र्यंबकेश्वर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या दोन्हीही अपघातांची माहिती मिळताच गोंदेफाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातातील जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता कुऱ्हेगावजवळील अपघातातील तरुणास उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन्हीही अपघातांचा पुढील तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
कुऱ्हेगावजवळ झालेल्या अपघातात दुचाकीची झालेली अवस्था. (१० नांदूरवैद्य १)