इंदिरानगरात दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:10 AM2019-11-24T01:10:24+5:302019-11-24T01:10:38+5:30
येथील गजानन महाराज रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास राम कपोते हे दुचाकी (क्रमांक एमएच १५, सीडी २८७२) वरून चार्वाक चौकाकडून जॉगिंग ट्रॅककडे जात असताना राधे अपार्टमेंटसमोर एमएच १५ बीबी ४९३३ यावरील दुचाकीचालकाने ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येऊन कपोते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास राम कपोते हे दुचाकी (क्रमांक एमएच १५, सीडी २८७२) वरून चार्वाक चौकाकडून जॉगिंग ट्रॅककडे जात असताना राधे अपार्टमेंटसमोर एमएच १५ बीबी ४९३३ यावरील दुचाकीचालकाने ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येऊन कपोते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात कपोते यांच्या डोक्यावरील हेल्मेट पडून त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी औषध उपचार सुरू असताना शनिवारी (दि.२३) सकाळी सव्वा आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीवरून पडून मजूराचा मृत्यू
लॅमरोड सौभाग्यनगर येथे गणेश पार्क येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सेन्ट्रिंगचे काम करत असताना मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.
सौभाग्यनगर येथे नव्याने बांधण्यात येणाºया गणेश पार्क इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जियालाल यादव (३२) हा गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सेन्ट्रिंगचे काम करत होता. यावेळी राजेशकुमार याचा तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन महाराज रस्त्यावरील चार्वाक चौक ते मोदकेश्वर चौक या रस्त्यादरम्यान दिवसभर दुतर्फा वाहने रस्त्यावर तासन्तास उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा लहान-मोठे अपघातही होतात. परंतु, संबंधित विभागांकडून येथील पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.