लॉटरी लागल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक
By admin | Published: October 20, 2015 10:39 PM2015-10-20T22:39:34+5:302015-10-20T22:41:03+5:30
लॉटरी लागल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक
इगतपुरी : कौन बनेगा करोडपती या कार्यक्र माच्या माध्यमातून तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे खोटे सांगून इगतपुरी शहरातील एका साडी विके्रत्याला एक लाख रु पयांचा गंडा घालण्यात आला असून संबंधित मुंबईच्या पाच इसमांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात साडी विक्रेत्याने तक्रार दाखल केली आहे.
इगतपुरी शहरातील भाजी बाजार मार्गावर दिलीप परदेशी यांचे साडी विक्र ीचे दुकान आहे. ८ आॅक्टोबर रोजी परदेशी यांच्या मोबाइल क्र मांकावर मुंबई येथून ००९२३०२७१४९७१० व ००९२३४०७२३१२५८ या दोन्ही क्रमांकावरून दूरध्वनी आले. या दूरध्वनीद्वारे त्यांना सांगण्यात आले की, आम्ही कौन बनेगा करोडपतीमधून बोलत असून तुमचा सदरचा मोबाइल क्रमांक वोडाफोन कंपनीने दिला आहे. तुमच्या मोबाइलमधील सिमवरील क्रमांक ८९९१० हा असून, कौन बनेगा करोडपतीमार्फत तुम्हाला २५ लाखांची लॉटरी बक्षीस म्हणून लागली आहे.
दरम्यान, परदेशी यांनी सिमवरील क्र मांक बघितला असता तो अचूकपणे असल्याने सदर दूरध्वनी करणाऱ्या सुंदरसिंघ आणि सिंघानिया या दोन्ही व्यक्तींवर विश्वास बसला. त्यानुसार इन्कमटॅक्स खर्च १५,१०० रुपये तुम्ही करिश्मा सिंघ यांच्या स्टेट बँक शाखा ०००५६०८ येथील या खाते क्रमांकावर ३५०७४६२१५६९ जमा करण्यास सांगितले. ९ आॅक्टोबर रोजी परदेशी यांनी ही रक्कम बँकेत भरली. त्यानंतर कमिशन म्हणून २५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. परदेशी यांनी पुन्हा स्टेट बँकेच्या रॉबिनकुमार नामक व्यक्तीच्या खात्यावर २५ हजार रुपये जमा केले.
दरम्यान, मोठे खाते बनविण्यासाठी पुन्हा ६० हजार रुपये भरण्याचे सांगण्यात आले. परदेशी यांनी उसने ६० हजार रुपये आणून विष्णू प्रसाद पत्रा नामक इसमाच्या स्टेट बँकेच्या या २०२९११७३१३० खाते क्र मांकावर रक्कम जमा केली.
दरम्यान, परदेशी यांनी बक्षीसाच्या रकमेसाठी संबंधित व्यक्तींना दूरध्वनी केले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व अजून एक लाख वीस हजार जमा करा असे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणात फसवणूक झाल्याचे परदेशी यांच्या लक्षात आले. त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुंदर सिंघ, सिंघानिया, करिना सिंघ, रॉबिन कुमार व विष्णू प्रसाद पत्रा या पाच जणांविरोधात फसवणूक झाल्याची तक्र ार दाखल केली आहे. (वार्ताहर)