बारावी परीक्षेला  विभागात एक लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:55 AM2020-02-12T01:55:37+5:302020-02-12T01:56:54+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दि. १८ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या बारावी परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे.

One lakh 5 thousand students enrolled in the XII examination section | बारावी परीक्षेला  विभागात एक लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

बारावी परीक्षेला  विभागात एक लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दि. १८ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या बारावी परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे.
विभागातील २४३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे नियोजन नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले असून, विभागात एकूण ५९ परीक्षकांची या परीक्षेवर करडी नजर राहणार आहे. विद्यार्थ्यांना असामान्य परिस्थितीत परीक्षेच्या एकदिवस आधीपर्यंत अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याची सवलत विद्यार्थी संख्येत बदल होण्याची शक्यता असली तरी विभागीय मंडळाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ७५ हजार ३४३, धुळ्यातील ४४ केंद्रांवर २५ हजार २६४, नंदुरबारमध्ये ७१ केंद्रांवर ४९ हजार ४०३ व जळगावात २४ केंद्रांवर १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागीय शिक्षण मंडळाने कार्यकक्षेतील चारही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांचा आढावा घेतला असून, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विभागात ५९ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नाशिक जिल्ह्यात २७, धुळे ८, नंदुरबार ७, जळगावात १७ परीक्षकांची बारावीच्या परीक्षेवर करडी नजर राहणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच परीक्षेसाठी शाळांनी संकेतस्थळावरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या परीक्षा प्रवेशपत्रावरही परीक्षेचे वेळापत्रक सविस्तररीत्या दिलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षेचे नियोजन सोपे होणार आहे.
बारावीची परीक्षा दि. १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार असून, नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला आतापर्यंत सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

इन्फो-
जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या जिल्हा बारावी परीक्षा केंद्र परीक्षक नाशिक ७५,३४३ ९५ २७ धुळे २५,२६४ ४४ ८ नंदुरबार ४९,४०३ ७१ ७ जळगाव १६,४६८ २४ १७ एकूण १,६६,४७८ २३४ ५९

Web Title: One lakh 5 thousand students enrolled in the XII examination section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.