नस्तनपूर देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:00 PM2020-04-18T21:00:06+5:302020-04-19T00:41:16+5:30

नांदगाव : येथील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील श्री शनिमहाराज मंदिर देवस्थानच्या वतीने कोरोनाबाबतच्या आपत्कालीन स्थिती निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे दिला.

 One lakh check from Nastanpur Devasthan | नस्तनपूर देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश

नस्तनपूर देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश

Next

नांदगाव : येथील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील श्री शनिमहाराज मंदिर देवस्थानच्या वतीने कोरोनाबाबतच्या आपत्कालीन स्थिती निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे दिला. नारायण अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रमुख विश्वस्त माजी आमदार अ‍ॅड. अनिल आहेर यांनी धनादेश दिला. यावेळी विश्वस्त खासेराव सुर्वे, विजय चोपडा, उदय पवार आदी उपस्थित होते. याशिवाय गोरगरीब अपंग, विधवा व अन्य घटकातील लोकांसाठी संस्थानने जीवनोपयोगी वस्तूंचे बनविलेले किट लवकरच वाटप करण्यात येतील, अशी माहिती अ‍ॅड. आहेर यांनी दिली. श्रीक्षेत्र नस्तनपूर संस्थानच्या भक्तनिवास इमारतीत आधुनिक विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
 

Web Title:  One lakh check from Nastanpur Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक