सिन्नर वाचनालयास एक लाखाची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:00+5:302021-03-16T04:15:00+5:30
---------------------------------- कीड रोखण्यासाठी सापळा पिकांची लागवड करा सिन्नर: वाढत्या तापमानामुळे कांदा पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ...
----------------------------------
कीड रोखण्यासाठी सापळा पिकांची लागवड करा
सिन्नर: वाढत्या तापमानामुळे कांदा पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी कांद्याची लागवड करण्यापूर्वी मका व गव्हाच्या प्रत्येकी चार ओळी लागवड क्षेत्राच्या चारही बाजूने केल्यास कीड व रोगावर प्रतिबंध करता येतो, असे आवाहन राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
-------------------
बॅँकांच्या संपामुळे कामकाज ठप्प
सिन्नर: बॅँक खासगीकरणाविरोधात दोन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सिन्नरच्या बॅँकाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. तालुक्यातील प्रमुख बॅँकांसह अन्य बॅँका खासगीकरणाच्या विरोधात एकवटल्याने बॅँका बंद होत्या. त्यामुळे नेहमीची गर्दी असणाऱ्या बॅँकांमध्ये शुकशुकाट दिसून आला. संपात सर्वच बॅँक कर्मचारी सहभागी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे आर्थिक कामकाज ठप्प होते. व बॅँकाच्या बाहेर संपामुळे बॅँक बंद असल्याचे फलक दिसून आले.
-----------------
वावीचा आजचा आठवडे बाजार बंद
सिन्नर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिका-यांनी गर्दी टाळण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी भरणारा वावीचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. पूर्व भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वावी येथील आठवडे बाजार बंद राहणार असल्याने परिसरातील २० ते २५ गावातील व्यावसायिक व भाजीपाला विक्रेत्यांवर त्यांचा परिणाम होणार आहे. व्यावसायिक व भाजीपाला विक्रेत्यांनी माल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
---------------
सिन्नरला दोन दिवसात २४ कोरोनाबाधित
सिन्नर: शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसात २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवस विकएंड लॉकडाऊन पाळण्यात आले होते. या दोन दिवसाच्या कालावधीत शहर व तालुक्यात २४ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडावे व मास्कचा वापर करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.