राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे एक लाख पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 06:15 PM2020-07-23T18:15:17+5:302020-07-23T18:18:50+5:30

, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

One lakh letter to NCP's Venkaiah Naidu declaring 'Jai Bhavani, Jai Shivaji' | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे एक लाख पत्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे एक लाख पत्र

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे व्यंकय्या नायडू यांना एक लाख पत्रपत्रांवर 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणाव्यंकया नायडू यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

नाशिक : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाभरातून नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे एक लाख पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची गुरुवारी जीपीओ पोस्ट ऑफिस पासून सुरुवात करण्यात आली. 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने व्यंकया नायडू यांचा निषेध म्हणून राज्यभरातून २० लाख ‘जय भवानी, जय शिवाजी’ आशयाचे पत्र पोस्ट करण्याच्या सूचना प्रदेशस्तरावरून प्राप्त झाल्या होत्या. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्ह्यातून १ लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठविण्याच्या आंदोलनास जीपीओ पोस्ट आॅफिस येथून सुरुवात करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन पत्र टपाल पेटीत पोस्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्यासह तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, भूषण शिंदे, जयराम शिंदे, अक्षय कहांडळ, संदीप भेरे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, धिरज बच्छाव, बबलू पाटील, प्रशांत लाभडे, विशाल गायधनी, महेश शेळके, लखन बेंडकुळे, समाधान पवार आदी उपस्थित होते.
 

Web Title: One lakh letter to NCP's Venkaiah Naidu declaring 'Jai Bhavani, Jai Shivaji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.