घरफोडीत एक लाखाचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:38 AM2021-12-09T01:38:09+5:302021-12-09T01:40:00+5:30
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे असलेल्या सदनिकेतील बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्या- चांदीचे दागिने असा जवळपास एक लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे असलेल्या सदनिकेतील बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्या- चांदीचे दागिने असा जवळपास एक लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवनातील चव्हाण नगर येथील गोदाई अपार्टमेंट येथे राहणारे निखिल राजाराम इगल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इगल हे काल सोमवारी कामानिमित्त मामाच्या गावाला गेले होते. त्याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील मणी-मंगळसूत्र, चेन, कानातील साखळी, असा पावणेपाच तोळे वजन असलेल्या वस्तू, तसेच चांदीचा कमरपट्टा, ताळेबंद या आणि रोख दहा हजार रुपये रोकड, असा
एक लाख सात हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून घरफोडी केली आहे. भरवस्तीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.