एका महिन्यात एकाच ठिकाणी चौथा बिबट्या पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:40 PM2018-09-15T15:40:03+5:302018-09-15T16:01:48+5:30
सायखेडा : गायींचा कळप, पक्षांचा थवा, कुत्र्यांची झुंड अस पहायला आणि ऐकायला मिळत पण बिबट्याचा कळप अस मानवी वस्तीत तरी पहायला मिळत नाही मात्र एकाच महिन्यात एकाच ठिकाणी एकाच गावात चार बिबटे जेरबंद होणे आणि आणखी दोन दिसणे हे वन क्षेत्र नसलेल्या माळरान आणि मानवी वस्ती असलेल्या महाजनपुर सारख्या गावात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सायखेडा : गायींचा कळप, पक्षांचा थवा, कुत्र्यांची झुंड अस पहायला आणि ऐकायला मिळत पण बिबट्याचा कळप अस मानवी वस्तीत तरी पहायला मिळत नाही मात्र एकाच महिन्यात एकाच ठिकाणी एकाच गावात चार बिबटे जेरबंद होणे आणि आणखी दोन दिसणे हे वन क्षेत्र नसलेल्या माळरान आणि मानवी वस्ती असलेल्या महाजनपुर सारख्या गावात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकाच शेतात, एकाच ठिकाणी चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याने मनात भीती कायम आहे
वन क्षेत्र कमी झाल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र माठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्याट्या सातत्याने येतो मात्र महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळ परिस्थितीमुळे ऊसाचे क्षेत्र नाही शिवाय टेकडी, डोंगर,दाट झाडी असा कोणताही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे
नाशिक महानगर पालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर ,शेतात फिरताना दिसतात बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे खरीप हंगामातील पिकांचे कामे शेतात सूरु असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकर्यांना शेतात जावे लागते पंधरा दिवसात तिसरा बिबट्या पकडला असून आणखी एक असल्याचा संशय असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे वन विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे
त्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी भैया शेख,विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेल्याचे समजते.
चौकट
कायमचा बंदोबस्त करावा
महाजनपुर शिवारात सातत्याने बिबट्या दिसत आहे वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे आणखी दोन असल्याचे नागरिकांना दिसले आहे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आल्याने या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील
आशा बचवंत फड
सरपंच महाजनपुर.
महाजनपुर येथे पंधरा दिवसात जेरबंद झालेला तिसरा बिबट्या.