दुगारवाडी येथे अडकलेल्या पर्यटकांपैकी एक जण गेला वाहून; 22 जणांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 09:19 AM2022-08-08T09:19:31+5:302022-08-08T09:20:04+5:30
त्र्यंबकेश्वर जवळील घटना. दुगारवाडी धबधब्याजवळ पर्यटनासाठी रविवारी मोठी गर्दी झाली होती.
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडीच्या धबधब्याजवळ रविवारी रात्री अडकलेल्या २२ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र एक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली त्याचा शोध सुरू आहे.
दुगारवाडी धबधब्याजवळ पर्यटनासाठी रविवारी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत पर्यटकांची गर्दी काय होती. धबधबा आणि दरीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक दरीत खाली उतरून गेले मात्र कोसळणारा पाऊस आणि अंधारामुळे त्यांना वर येण्यास मार्ग सापडत नसल्याने ते अडकून पडले.
जवळपास 20 पेक्षा अधिक पर्यटक दरीत अडकले होते. सायंकाळी स्थानिक ग्रामस्थांनी त्र्यंबकेश्वर वन कार्यालयाबाबत माहिती दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रत्येक कक्षाला याबाबत माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. बावीस पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र एक पर्यटक वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.