बस अपघातात १० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:33 PM2020-02-17T12:33:09+5:302020-02-17T12:34:30+5:30

पेठ - आंबेगण ते चाचडगाव दरम्यान पेठ- दिंडोरी बसला सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवासी जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे.

 One passenger injured in bus accident | बस अपघातात १० प्रवासी जखमी

बस अपघातात १० प्रवासी जखमी

Next

पेठ - आंबेगण ते चाचडगाव दरम्यान पेठ- दिंडोरी बसला सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवासी जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे.
पेठ आगाराची बस क्र मांक एमएच-०७-सी-९५१५ सकाळी पेठहून दिंडोरीकडे जात असतांना आंबेगण जवळ स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. उंचावरून बस खाली गेल्याने पलटी झाली. बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला.परिसरातील व रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढून उमराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
--------------------------
जखमींची नावे
गोविंद रावजी बोरसे वय, चंद्रशेखर अरु ण पठाडे, कामील खुरशेद, भूरा नवाब (सर्व रा. पेठ), हिरामण सखाराम कोतवाल, सुरज राजेंद्र गायकवाड, देविदास विठ्ठल कोतवाल, चंद्रकांत देविदास कोतवाल (सर्व रा. आंबेगण), कृष्णा इंपाळ (तोंडवळ), रामनाथ सिताराम गायकवाड (गोळशी)
-------------------------------------
नादुरु स्त बसेसचा प्रश्न ऐरणीवर
पेठ आगाराच्या बसेस कायम नादुरूस्त स्थितीत रस्त्यावरून धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक वेळा या ना त्या कारणाने बसेस रस्त्यावर पडून राहिल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. पेठ आगाराच्या अनेक बसेस डोंगरदर्यातून घाटातून प्रवास करत असल्याने जूनाट व नादुरु स्त बसेस अशा प्रकारे अवघड वळणावरून धावतांना चालक वाहकासह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. तरी पेठ आगाराला नव्या बसेस देण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Web Title:  One passenger injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक