ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:35+5:302021-01-08T04:41:35+5:30

--------------- किरकोळ कारणावरून करंजगव्हाणला मारहाण मालेगाव : सामायिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून कुरापत काढून तिघा जणांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी ...

One person was injured in a tractor collision | ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण जखमी

ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण जखमी

Next

---------------

किरकोळ कारणावरून करंजगव्हाणला मारहाण

मालेगाव : सामायिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून कुरापत काढून तिघा जणांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी वडनेर, खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती कैलास जाधव या महिलेने फिर्याद दिली आहे. सामायिक विहिरीवरून पाणी भरत असताना कैलास निंबा जाधव, निंबा रतन जाधव, लताबाई निंबा जाधव यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एम.एन. सोनवणे हे करीत आहेत.

----------------

अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील साकुर येथील दोघा अल्पवयीन मुलींना काहीतरी आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या शरद दत्तू पवार, अभिजित बळीराम निकम, दोघे रा. साकुर यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या काकांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

----

मालेगावी कडाक्याची थंडी गायब

मालेगाव : शहर व तालुक्यातून कडाक्याची थंडी गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता; मात्र या आठवड्यात कडाक्याची थंडी कमी झाली आहे. दुपारच्या सत्रात कडक ऊन लागत आहे. या बदलत्या वातावरणातून आबालवृद्धांना त्रास होत आहे.

----------------

सामान्य रुग्णालयात रिक्त पदे भरण्याची मागणी

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. कोरोनाकाळातही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. शासनाने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: One person was injured in a tractor collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.