मेसनखेडेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 06:16 PM2020-06-26T18:16:48+5:302020-06-26T18:17:56+5:30
चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे बुद्रूक येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास नाशिकच्या सामान्य रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २६) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Next
सदर व्यक्ती मेसनखेडे बुद्रूक येथील रहिवाशी असून सध्या कल्याण येथे वास्वव्यास आहे. दि. १५ जून रोजी तो मेसनखेडे येथे आला होता. तपासणीनंतर तो बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने मेसनखेडे परिसरातील नागरीकांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. काम नसताना अकारण फिरु नये, घरीच थांबूद काळजी घ्यावी तसेच घराबाहेर पडताना मास्क वापरावे व शासनातर्फे निर्धारित केलल्या नियमांचे पालन करावे, हात सॅनिटायझर किंवा साबणाने धुवावेत असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.