दिंडीनिहाय एका प्रतिनिधीस जाण्याची परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:58+5:302021-06-16T04:20:58+5:30
पंचवटीतील वारकरी भवन येथे वारकरी सेवा समिती बैठक अमर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात ...
पंचवटीतील वारकरी भवन येथे वारकरी सेवा समिती बैठक अमर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. सामान्य वारकरी यंदाच्या वर्षी पांडुरंगाच्या दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठी किमान ज्या ५० वारकऱ्यांना पंढरपूर येथे जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे त्यात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत जे आजवर लोक पायी चालत जातात त्या प्रमुख दिंड्यातील किमान एका वारकऱ्याला तरी पालखी सोबत जाण्याची परवानगी मिळावी या विषयावर चर्चा करण्यात येऊन धर्मादाय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
बैठकीला सागर महाराज दिंडे, चैतन्य महाराज नागरे, प्रथमेश महाराज काकड, श्रीराम खुर्दळ, नितीन सातपुते, बाळासाहेब काकड, लक्ष्मीचंद्र शेंडे आदींसह वरकरी सेवा समितीचे पदाधिकारी वारकरी उपस्थित होते.
कोट-
आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्यात दिंडीनिहाय एका प्रतिनिधीला सोहळ्यात सहभागी होण्याची शासनाने परवानगी द्यावी; मात्र सदर दिंडी सोहळ्यात माजी विश्वस्तांना सहभागी होण्याची परवानगी नको कारण संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या माजी विश्वस्ततांवर संस्थांमधील गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे त्याची धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी सुरू असल्याने त्यांना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे निवेदन धर्मादाय आयुक्तांना वारकरी सेवा समिती मार्फत देण्यात आले आहे.
- अमर ठोंबरे, अध्यक्ष वारकरी सेवा समिती (फोटो १५ पंचवटी)