कार अपघातात एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:23 AM2019-10-19T00:23:40+5:302019-10-19T00:23:55+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई महामार्गावर मुंढेगाव आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) घडली. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ मुंबईकडे जाणाऱ्या कारवरील (एमएच ४३ एआर ८३६८) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या दुसºया बाजूला जाऊन आदळली. या अपघातात कारचालक प्रदीप रावजी पटेल (३६, रा. मुंबई) गंभीर जखमी झाला असून, अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमी युवकास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत. चालकाचा प्रामाणिकपणाअपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी जखमी झालेल्यांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीकडे रोख रक्कम नऊ हजार नऊशे
रु पये व पंधरा ते वीस हजारांचा मोबाइल तिथेच पडल्याचे गुंड यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी घटनास्थळाहून रक्कम व मोबाइल उचलून नेला. त्यानंतर जखमी व्यक्तीचे नातेवाईक आल्यानंतर सर्व रक्कम व मोबाइल प्रामाणिकपणे गुंड यांनी जखमींच्या नातेवाइकांकडे सोपविला.