एकलहरे वीज केंद्रातील एक संच बंद

By admin | Published: May 7, 2017 03:45 AM2017-05-07T03:45:23+5:302017-05-07T03:45:23+5:30

राज्यभरातून वाढलेल्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यास एकलहरे

One set off in the unorganized power station | एकलहरे वीज केंद्रातील एक संच बंद

एकलहरे वीज केंद्रातील एक संच बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यभरातून वाढलेल्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यास एकलहरे औष्णिक केंद्रामधील नादुरुस्त व तोकडे संचदेखील कारणीभूत ठरले आहे. प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित असून, दिवसाला ४२० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रावर सुमारे चार वर्षांपूर्वी पाच संचाद्वारे कार्य केले जात होते. त्यापैकी दोन संच सुमारे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने झाल्यामुळे ते कालबाह्य ठरविले गेले.एकूण ६३० मेगावॅट वीजनिर्मिती होत असे; तांत्रिक बिघाडामुळे एक संच उन्हाळ्यात दोनदा बंद राहिला तर दुरुस्तीसाठी पुन्हा आठवडाभरापासून संच बंद पडलेला आहे.

Web Title: One set off in the unorganized power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.