एकशिक्षकी शाळांचे होणार वर्गीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:33+5:302021-02-06T04:24:33+5:30
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, अशा हेतूने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय अनेक ठिकाणी पर्याय नाही. काही ...
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, अशा हेतूने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय अनेक ठिकाणी पर्याय नाही. काही ठिकाणी खासगी शाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खासगी शाळांकडे वळले. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दोन आकड्यापर्यंतच सीमित राहिली असली तरी, विद्यार्थी असल्यामुळे शाळा सुरू ठेवणे अपरिहार्य आहे. परंतु अशा शाळांवर व्यवस्थापनाचा खर्च होत असून, एकच शिक्षक असल्याने बऱ्याच वेळा शिक्षकाच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या विद्यादानावरही परिणाम होत आहे. शिवाय यातील बऱ्याचशा शाळा नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एकशिक्षकी शाळांची संख्या सुमारे ५५ इतकी असून, या शाळांवरील ताण कमी करण्यासाठी नजीकच्या शाळेमध्ये विद्यार्थी वर्ग करण्याचा विचार केला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत शाळा व विद्यार्थ्यांची संख्या याची माहिती मागविली आहे.