दीडशे रुपयांच्या अनुदानासाठी मोजावे लागणार हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:55+5:302021-07-12T04:10:55+5:30
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दीडशे रुपयासाठी हजार रुपयाचे बँक खाते सक्तीचे केले ...
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दीडशे रुपयासाठी हजार रुपयाचे बँक खाते सक्तीचे केले आहे. उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आहे. परंतु हे प्रमाण फारच अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे बँक खाते उघडावे लागत आहे. सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवीसाठी १५६ रुपये, तर सहावी ते आठवीसाठी २३४ रुपये आहे. कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांची सुद्धा चिंता वाढली आहे.
इन्फो
गर्दीमुळे संसर्गाची भीती
किमान दीडशे रुपयाच्या अनुदानासाठी एक हजार रुपये व पाचशे रुपये भरुन बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी बँकेत होताना दिसून येत असल्याने या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
फोटो- ११ चांदवड स्कूल
शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे क्लिष्ट नियम रद्द करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देताना संदीप उगले, दत्तात्रेय गांगुर्डे, पांडुरंग भडांगे, दीपक शिरसाठ, सोमनाथ जाधव, विकी गवळी आदी.
110721\11nsk_38_11072021_13.jpg
फोटो- ११ चांदवड स्कूल शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांचे बॅक खाते काढण्याचे क्लिष्ट नियम रद्द करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देतांना संदीप उगले, दत्तात्रेय गांगुर्डे, पांडुरंग भडांगे, दीपक शिरसाठ, सोमनाथ जाधव, विकी गवळी आदी.