आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:21 AM2020-08-10T01:21:41+5:302020-08-10T01:22:05+5:30

जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

One time water supply if required | आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा

आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देभुजबळ : निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मुंबईपाठोपाठ नाशिकच्या धरणक्षेत्रात पाऊस पडेल, ही अपेक्षा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. नाशिकमधील विविध धरणांपैकी कुठे ४०-४५ टक्के, तर कुठे त्याहून थोडे अधिक इतकाच पाणीसाठा आहे. एकूणात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचे सरासरी प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नाशिकलाच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, अपर वैतरणा धरणेदेखील भरलेली नाहीत.
त्यामुळे मुंबईतही २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
नियोजनाची गरज
दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिकची धरणे भरू लागलेली असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आताच विचार करावा लागणार आहे.
किती कपात करायची की काही बदल करायचे, त्याचा निर्णय महापालिका प्रशासनानेच घ्यायचा आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Web Title: One time water supply if required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.