तीन प्रभागांत एकवेळ पाणी
By admin | Published: August 27, 2016 12:22 AM2016-08-27T00:22:10+5:302016-08-27T00:22:18+5:30
आजपासून अंमलबजावणी : नाशिकरोड व पूर्व विभागातील काही भागांचा समावेश
नाशिक : महापालिकेने शहराच्या काही भागात दोनवेळ पाणीपुरवठा सुरू केला असला तरी नाशिकरोड व पूर्व नाशिक विभागातील प्रभाग ३१, ३७ आणि ३८ मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने आता या तिन्ही प्रभागांत शनिवारपासून (दि. २७) एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सदरचा पाणीपुरवठा एकवेळ परंतु मुबलक स्वरूपात असणार असून स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून हा बदल करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.
असा असेल पाणीपुरवठा
गांधीनगर जलकुंभ दोन व चार- वेळ रात्री १२ ते पहाटे ५- नाशिकरोड विभागातील तरण तलाव परिसर पंजाब कॉलनी, वेळ : सकाळी ५ ते ७.३०- नाशिक पूर्व विभागातील उपनगर, शांतीनगर, मातोश्रीनगर, संजय गांधीनगर, अयोध्यानगर, रामदास स्वामीनगर १,२, ३.
इंद्रप्रस्थ (इच्छामणी) जलकुंभ - वेळ सकाळी ५.३० ते ७.३०- नाशिक पूर्व विभागातील प्रभाग ३७ मधील आम्रपाली झोपडपट्टी, इंद्रप्रस्थ कॉलनी, नवीन चाळ,
अप्पू चौक, पगारे मळा, श्रमनगर तसेच नाशिकरोड विभागातील हनुमंतनगर, मकरंद गोसावीनगर परिसर.
गांधीनगर जलकुंभ क्रमांक २ - वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६- नाशिकरोड प्रभागातील प्रभाग ५५ मधील शहाणे मळा, लोणकर मळा, लवटेनगर, जयभवानी रोड परिसर, फर्नांडिस वाडी, अश्विनी नगर,
प्रभाग क्रमांक ५९ मधील धोंगडेनगर, ओमनगर, घाडगे मळा, जगताप मळा, आर्टिलरी सेंटर रोड तसेच प्रभाग ६० मधील सुवर्णा सोसायटी, हरिओम नगर, रोकडोबावाडी
शिवशक्तीनगर जलकुंभ - वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री नऊ - प्रभाग क्रमांक ३३ व ३५ मधील शिवशक्तीनगर मजलकुंभावरून दसक, पंचक, पिंपळवटीरोड, वीर सावरकरनगर, त्रिमूर्तीनगर व सायखेडा रोड परिसर. (प्रतिनिधी)