विजेच्या समस्या सोडविण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 09:34 PM2021-01-20T21:34:58+5:302021-01-21T01:15:30+5:30
देवळा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी ह्यएक गाव-एक दिवसह्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...
देवळा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी ह्यएक गाव-एक दिवसह्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. खुंटेवाडी येथील सभागृहात शेतकरी व नागरिक यांच्याशी संवाद साधत या अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत विद्युत जोडणी, विजेचे खांब तसेच तारांच्या अडचणी, रोहित्रातील बिघाड यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता राजेश हेगडे यांनी तातडीने निर्णय घेत शेतकरीवर्गाच्या समस्यांचे निराकरण केले. येथील भाऊसाहेब आनंदा पगार, प्रशांत भामरे यांना त्वरित विद्युत जोडणी कोटेशन देण्यात आले. ज्या ठिकाणी तारा, खांब यांबाबत तक्रारी होत्या त्या दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्युत बिल भरणा करणेसंदर्भात सवलतीचे धोरण विद्युत वितरण कंपनीने स्वीकारले असून त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक अभियंता आर. पी. महाजन, आर. एस. खाडे, वीज ठेकेदार सतीश बच्छाव, सहाय्यक लेखापाल निशान आहेर, वायरमन नागू भामरे यांनी संयोजन केले. यावेळी उद्धव भामरे, जिभाऊ भामरे, राजाराम सावकार, संजय भामरे व इतर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी केले.
नवीन कृषीपंप जोडणीबाबत या योजना
अभियानांतर्गत नवीन कृषीपंप जोडणीबाबत या योजना आहेत. पैसे भरून प्रलंबित असलेल्या व ३० मीटर अंतर असलेल्या अर्जदारास एकच महिन्यात अर्जजोडणी तसेच ३० ते २०० मीटर अंतर असल्यास एरियल बेंच केबलद्वारे तीन महिन्यांच्या आत वीजजोडणी आणि २०० ते ६०० मीटर अंतर असल्यास उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी. याशिवाय ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास सौरपंपाद्वारे वीज जोडणी करण्यात येणार आहे.