श्रमदानातून साकारले वनराई बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:29 PM2019-12-19T18:29:19+5:302019-12-19T18:29:29+5:30
सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी के. वाय. सिद्दिकी, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहायक विठ्ठल मेहेरे व संजय मोरे यांनी गावातील तरु णांना प्रोत्साहित करून श्रमदानातून दोन वनराई बंधार्यांची निर्मिती केली आहे.
येवला : सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी के. वाय. सिद्दिकी, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहायक विठ्ठल मेहेरे व संजय मोरे यांनी गावातील तरु णांना प्रोत्साहित करून श्रमदानातून दोन वनराई बंधार्यांची निर्मिती केली आहे.
पाणीटंचाईचे दाहक चटके गावेवाड्यांसह विविध भागांतील वन्यप्राण्यांनाही बसत असतानाच, त्यावर मात करण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध पाणी साठवून ठेवण्याच्या उद्देशाने कोळम खुर्द येथे श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते.
येवला तालुक्यात आॅक्टोबरपर्यंत समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झाल्याने बहुतांशी नदी, ओढ्यांतून पाणी वाहत आहे. हे वाहून जाणारे पाणी जलसंधारण क्षमता वाढण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी येथील लेंडी नाल्यावर दोन वनराई बंधारा बाधून पाणी अडवण्यात आले आहे.
या अडवलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीस, विहिरी व कूपनलिका यांना याचा फायदा होणार आहे. याप्रसंगी सरपंच सोपान चव्हाण, प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कदम, युवा कृषिमित्र वैभव कदम, साईनाथ चव्हाण, कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.