महिलेची एक कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:54 AM2018-08-25T00:54:34+5:302018-08-25T00:55:37+5:30
नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महेश मधुकर मिरजकर, माजी नगरसेवक अनिल रखमाजी चौधरी व बेपत्ता तसेच फरार संशयित हर्षल प्रकाश नाईक यांनी गंगापूर रोडवरील महिलेस व्याजाचे आमिष दाखवून १ कोटी ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे़ गंगापूर रोडवरील सिरीन मेडोज परिसरातील वडेरा बंगल्यातील रहिवासी स्मिता मधुकर बच्छाव ऊर्फ स्मिता वडेरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरजकर व त्रिशा जेम्स सराफी पेढीचे संचालक नाईक, मिरजकर व चौगुले यांनी सुवर्णयोजनेतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार वडेरा यांनी ८ मे २०१७ ते दि. १९ जून २०१८ या कालावधीत आमिषाला बळी पडून योजनेमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली़ मात्र, त्यांना जून महिन्याचा ८० हजार रुपयांचा परतावाही दिला नाही़
स्मिता बच्छाव यांची संशयितांनी एक कोटी ८० हजार रुपयांची फसवूणक केली असून, त्यांनी काही दिवसांपूर्वीच गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांनी केलेल्या फसवणुकीबाबत तक्र्रार अर्ज केला होता़ या तक्रार अर्जाच्या चौकशीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़