युवतीच्या विनयभंगप्रकरणी एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:05+5:302021-02-21T04:29:05+5:30
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या पीडितेच्या घरात २५ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी राजू याने बळजबरीने प्रवेश केला ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या पीडितेच्या घरात २५ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी राजू याने बळजबरीने प्रवेश केला होता. यावेळी घरात कोण अज्ञात व्यक्ती शिरला हे बघण्यासाठी आलेल्या पीडितेचा हात ओढून राजूने पलंगावर ओढले. अश्लील भाषेत संवाद साधत त्याने स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. यावेळी पीडितेने त्याच्या तावडीतून निसटत घराबाहेर पडून दरवाजाला बाहेरून कडी लावून घेत पोलीस ठाणे गाठले. आरोपी राजू यास तिने घरात कोंडून ठेवले होते. अंबड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पीडितेचे घर गाठून राजूला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याविरुध्द पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक निरीक्षक जी.व्ही. शिंदे यांनी गुन्हा सिध्दतेसाठी कसोशीने तपास करत राजूविरुध्द सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महिनाभरापूर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पीडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले.