मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:30 PM2017-11-22T16:30:45+5:302017-11-22T16:31:22+5:30

नाशिक : मित्रांकडून सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळेचमुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद जुने नाशिकमधील मंगल पवार या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़

One's suicide due to abusive behavior from friends | मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या

मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाने ; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

नाशिक : मित्रांकडून सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळेचमुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद जुने नाशिकमधील मंगल पवार या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिकमधील सोमवार पेठेतील नारायण निवास येथील गणेश ऊर्फ सिद्धार्थ जनार्दन पवार या पंचवीस वर्षीय युवकाने १५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या आत्महत्येस त्यांचे मित्र प्रविण सावंत, संदीप पाटील, दीपक व सचीन पाटील हे जबाबदार असून हे चौघेही नेहेमी अपमानास्पद वागणूक देऊन टोमणे मारत होते़ यामुळे त्रस्त झालेल्या सिद्धार्थने आत्महत्या केल्याचे मंगल जनार्दन पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़
दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: One's suicide due to abusive behavior from friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.