कांदा २०, बटाटा १३ तर लसूण १०० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:53+5:302021-07-12T04:10:53+5:30
चौकट- मेथी, शेपू उतरली पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली असून कोथंबिरीला दर मिळत असला तरी मेथी आणि शेपूचे दर कमी ...
चौकट-
मेथी, शेपू उतरली
पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली असून कोथंबिरीला दर मिळत असला तरी मेथी आणि शेपूचे दर कमी झाले आहेत. फळभाज्यांमध्ये फ्लॉवर चार ते ९ तर कोबी ११ ते २१ रुपये किलो दराने विकला जात आहे.
चौकट-
पपई १६ रुपये किलो
फळांची आवक कमी असल्यामुळे बाजार समितीत फळांचे दर टिकून असून चांगल्या दर्जाच्या सफरचंदास घाउक बाजारात २५० रुपये तर पपईला १६ रुपये किलोचा दर मिळत आहे. इतर फळांचे भावही टिकून असून मागणी कायम आहे.
चौकट-
सोयातेल १४० रुपये लिटर
किराणा बाजारात सोयाबीन तेल १४० ते १४५ रुपये लिटरपर्यंत आले असून इतर तेलाचे दर स्थिर आहेत. डाळींच्या दरांमध्ये फारसा चढ-उतार झालेला नाही. लग्नांच्या मुहूर्तांमुळे बाजारात थोडे उत्साहाचे वातावरण असून ग्राहकही वाढली आहे.
कोट-
डिझेल दरवाढीचा फटका दुकानदारांना सहन करावा लागत असून वाहतूक दर वाढले तरी किरकोळ बाजारात लगेचच वस्तूंचे दर वाढविता येत नसल्यामुळे किरकोळ दुकानदारांच्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
जून महिना उलटून गेला तरी अद्याप चांगला पाऊस पडला नसल्याने भाजीपाल्याच्या पिकांवर परिणाम होउ लागला आहे. वातावरणातील बदलामुळे पिके पिवळी पडण्याची भीती असल्यामुळे आहे ती लगेचच काढावी लागत आहेत. - पंढरीनाथ साळवे, शेतकरी
कोट-
भाजीपाला कमी झाला तर खाद्यतेल वाढते ते कमी झाले तर डिझेल, पेट्रोल वाढते गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांना अशा चढ-उताराला सामोरे जावे लागत आहे. घाऊक बाजारात दर उतरले तरी किरकोळ बाजारात आम्हाला किमत मोजावीच लागते - रोहिणी देवरे, गृहिणी