कांदा ६ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:48 AM2018-02-02T00:48:10+5:302018-02-02T00:50:11+5:30
लासलगाव : बाजार समितीत सलग कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरुवारी कमाल भावात दोनशे, तर किमान भावात तीनशे रुपयांची घसरण होत कांदा सहा रुपये किलो दराने विक्री झाला. किमान सहाशे रुपये भाव यावर्षातील सर्वात नीचांकी आहे.
लासलगाव : बाजार समितीत सलग कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरुवारी कमाल भावात दोनशे, तर किमान भावात तीनशे रुपयांची घसरण होत कांदा सहा रुपये किलो दराने विक्री झाला. किमान सहाशे रुपये भाव यावर्षातील सर्वात नीचांकी आहे.
गुरुवारी (दि. १) लाल कांद्याची आवक ६०० नग होती. बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ६०१, कमाल १७०७, तर सरासरी १५०० होते. सोमवारपेक्षा आज येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे, तर सरासरी भावात ३०० रुपये घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली. परंतु बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५० रुपये, कमाल भाव १९०५, तर सरासरी भावाची पातळी १६५० रुपये होती. लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रुपयांची, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मागील सप्ताहात ८५,५४४ क्विंटल आवक झाली होती तर किमान भाव १००० तर कमाल भाव ३१५८ व सरासरी भाव २८५३ रुपये होते. कोलंबोवगळता थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा दुप्पटीने वाढती आवक व गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात लासलगावसह विविध बाजारपेठेत वेगाने भावात घसरण होऊन मागील सप्ताहाच्या तुलनेत किमान भावात ६००, किमान ७५२ तर सरासरी भावात ९०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. कमी भावामुळे उत्पादन खर्च भरून निघणार नाही, त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. घसरणीचा वेग कायममागील सप्ताहात १७,१६८ क्विंटल कांदा लिलाव झाले. तेव्हा किमान १५००, कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रुपये होते. या सप्ताहात सोमवारी लिलावात किमान, कमाल व सरासरी भावात वर्षातील विक्र मी वेगाने घसरण होत १९,१५६ क्विंटल कांदा लिलावात किमान ९००, कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ जाहीर झाला. गुजरातबरोबरच मध्य प्रदेशसह इतर राज्यांत नवीन कांदा प्रचंड बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी होऊन सोमवारी भावात दररोज घसरण होत आहे.