कांदा, धान्य शेतमालाचे लिलाव आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:13 AM2018-04-24T00:13:54+5:302018-04-24T00:13:54+5:30
येथील बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य व्यापाऱ्यांवर बँकेतून पैसे काढल्यानंतर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारीवर्गाकडून लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव मंगळवारी (दि. २४) बंद ठेवून निषेध पाळण्यात येणार आहे.
लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य व्यापाऱ्यांवर बँकेतून पैसे काढल्यानंतर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारीवर्गाकडून लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव मंगळवारी (दि. २४) बंद ठेवून निषेध पाळण्यात येणार आहे. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावर शेतमाल विक्री झाल्यानंतर शेतकºयांना त्यांच्या मालाचे पैसे अदा करण्यासाठी येथील व्यापारी बँकेतून रोख रकमा काढतात. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडील रकमा चोरून नेण्याच्या घटना काही दिवसांपासून वारंवार लासलगाव येथे घडत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव व विंचूर येथील लासलगाव पोलीस ठाणे व बाजार समितीकडे सदर घटनेचा लवकरात लवकर तपास लावून संबंधित व्यापाºयांना न्याय मिळवून द्यावा, असे लेखी निवेदन सादर केले आहे. वारंवार होणाºया चोरीच्या घटनांचा तपास लवकरात लवकर न लागल्यास यापुढे लिलावाचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा दिला आहे.वरील वारंवार घडणाºया घटनांवर विचारविनिमय करण्यासाठी बाजार समितीने मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता तातडीने पोलीस प्रशासन, बँकांचे अधिकारी व व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक लासलगाव मुख्य कार्यालयात आयोजित केली असल्याचे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१८ मध्ये विंचूर येथील धान्य व्यापारी ईश्वर ढवण यांच्या कारच्या काचा फोडून गाडीतील रोख रकमेची बॅग चोरट्यांनी लंपास केली. त्याचा तपास अद्यापपावेतो लागलेला नसताना पुन्हा २३ एप्रिल रोजी कांदा व्यापारी राहुल सानप यांनी आपल्या खात्यातून ९ लाख रोख रक्कम काढून गाडीत बसत असताना अज्ञात इसमांकडून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून त्यांच्याकडील रोख रकमेची बॅग लंपास केली आहे.