कांद्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:12 PM2020-03-05T16:12:52+5:302020-03-05T16:13:06+5:30
येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.
येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.
15 मार्चनंतर कांदा भावात सुधारणा अपेक्षति आहे.बुधवारी येवला कांदा बाजार आवारात 1550 ते 1750 रु पये प्रति क्विंटल भावाने कांदा विकला गेला. साधारण गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 ते 150रु पये प्रति क्विंटल दराने भावात वाढ झाली. त्यामुळे अधिसूचना निघाल्यानंतर निर्यात बंदी उठेल आणि आणखी भाव वाढ वाढतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकर्यांना असल्याने कांदा आवक घटली आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशिया, सिंगापूर, बांगलादेश यासह आखाती देशात कांद्याला मोठी मागणी आहे.शिवाय देशात उन्हाळ कांदा देखील मोठ्या प्रमाणावर निघायला सुरु वात झाली आहे. साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा मार्केटला आणण्याशिवाय पर्याय नाही. 15 मार्चनंतर भाव वाढ झाली, की आवक वाढेल आणि त्यानंतर मार्च अखेर व्यवहार बंद असल्याने व्यापारी देखील खरेदी बंद ठेवतील. त्यानंतर अचानक आवक वाढून भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बाजार भाव किमान 1700 ते 2000 रु पये प्रति क्विंटल टाकावेत अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.