उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 07:20 PM2019-09-26T19:20:50+5:302019-09-26T20:00:59+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत उन्हाळी (गावठी) कांद्याची आवक वाढली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात सरासरीच्या दरात दररोज दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत उन्हाळी (गावठी) कांद्याची आवक वाढली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात सरासरीच्या दरात दररोज दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाºया कांद्याचे दर चालुवर्षी समाधानकारक असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांत आनंदाचे वातावरण होते. मागील आठवड्यात पाच हजारी गाठलेला कांदा अजुन किती भाव खातो याची उत्सुकता लागुन असतानाच मागील आठ दिवसांपासून दररोज सरासरीच्या दरात तब्बल दोनशे ते तिनशे रु पयांची घसरण होत असल्याचे चित्र असुन बाजारभाव अजुन कमी होतील की काय या भितीपोटी कांदा साठवणुकदार शेतकºयांनी कांदा विक्र ीस गर्दी केल्याने बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे.
परिणामी मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने सरासरीच्या दरात घसरण दिसुन आली आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वत्रच पाऊस सुरु असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या चार ते पाच मिहन्यांपासुन चाळीत साठवणुक केलेल्या कांद्यांची प्रतवारी घसरली आहे.
शिवाय कांदा खराब (सडण्याचे) होण्याचे प्रमाण वाढु लागल्याने बाजारभावात घसरण होत असतानाही शेतकºयांना नाइलाजास्तव कांदा विक्र ी करावा लागत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे.
उमराणे बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमीतकमी २ हजार रु पये, जास्तीत जास्त ३ हजार ६०० रु पये तर सरासरी ३ हजार ३०० रु पये इतके होते. ६५० ट्रक्टर व दोनशे दहा पिकअप वाहनांमधुन सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सरासरी बाजारभावात झालेली घसरण दिनांक व सरासरी बाजारभाव पुढील प्रमाणे -
गुरु वार दि.१९ सप्टेंबर - ४३०० रु पये,
शुक्र वार दि.२० सप्टेंबर - ४००० रु पये,
शनिवार दि.२१ सप्टेंबर - ३७५० रु पये,
सोमवार दि.२३ सप्टेंबर - ३७०० रु पये,
मंगळवार दि.२४ सप्टेंबर - ३६०० रु पये,
गुरु वार दि.२६ सप्टेंबर - ३३५० रु पये.
(फोटो २६ उमराण,े २६ उमराणे १)
उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याची वाढलेली आवक.