येवल्यात कांदा लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:38 PM2019-10-01T22:38:29+5:302019-10-01T22:41:21+5:30
येवला : कांद्याचे दर वाढल्याने शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले. दुपारपर्यंत वाट पाहूनही लिलाव सुरू न झाल्याने संतप्त शेतकºयांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकरी गेले. तेथे उपस्थित असलेले ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांच्या मध्यस्थीने व्यापारीवर्गाने लिलाव सुरू करण्याची तयारी दाखविली. दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांचे सहकारी बाजार समितीत आले. व्यापारी प्रतिनिधी नंदू अट्टल व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात चर्चा झाली आणि कांदा लिलाव सुरू झाले.
दरम्यान, केंद्र सरकारने घोषित केलेल्या निर्यातबंदी आणि साठवणुकीवर मर्यादा धोरणाचा शेतकरी संघटना आणि व्यापाºयांनी निषेध केला.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांची संख्या वीस-बावीस असून, त्यातही लिलावात भाग घेणारे पंधरा-सोळाच आहेत. अंदरसूल मार्केटमध्ये दहा-पंधरा व्यापारी असताना शेतकºयांनी कांदा कुठे विकायचा, असा प्रश्न उपस्थित केला.
उपस्थित शेतकºयांनी शासनाने निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील, नवनाथ काळे, देवीदास शेळके, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, बाळासाहेब गायकवाड राजेंद्र जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.