यात्रोत्सवादरम्यान कांदा लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:44 PM2018-02-09T23:44:12+5:302018-02-10T00:30:05+5:30
उमराणे : ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव यात्रोत्सवादरम्यान बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय संचालक व व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला.
उमराणे : येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव यात्रोत्सवादरम्यान दि. १३ ते १५ या तीन दिवसांसाठी उमराणे बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळ व व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमराणे येथील रामेश्वर महादेव यांची तीन ते चार दिवस भव्य यात्रा भरते. या यात्रोत्सवामुळे दरवर्षी संपूर्ण बाजार समितीचे कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार आठ दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवले जातात. परंतु चालूवर्षी शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात कांदा असून, भावही बºयापैकी असल्याने शेतकरी हितावह निर्णय घेत फक्त तीनच दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु भुसार (मका) मालाचे लिलाव संपूर्ण आठवडाभर बंद राहणार असल्याने मंगळवारी (दि.२०) पुन्हा भुसार मालाचे लिलाव पूर्ववत सुरू होतील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समितीचे सचिव नितीन जाधव यांनी केले आहे.