नांदूरशिंगोटेत कांदा लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:29 PM2020-02-07T23:29:04+5:302020-02-08T00:01:22+5:30
सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.
नांदूरशिंगोटे उपबाजारात कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीचे निवेदन पी. आर. जाधव यांना देताना दीपक बर्के, भारत दराडे, गणेश शेळके, भारत मुंगसे, शरद बर्के, हरिभाऊ मुंगसे, संजय शेळके आदी.
नांदूरशिंगोटे : सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.
महिन्यापूर्वी कांदा दहा हजार रु पये क्विंटल दराने विक्र ी होत होता. कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केली. एवढेच नव्हे तर कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीसाठी मर्यादा घालण्यात आली. काही दिवसांपासून बाजारात कांंद्याची आवक वाढून दर कमी झाले आहेत. नवीन माल बाजारात आल्याने शासनाने निर्यातबंदी उठविण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे. आज केवळ दोन हजार रु पयांच्या आत कांदा विकला जात असून, शेतकºयांना या दराने कांदा विकणे परवडत नाही. मात्र जास्त प्रमाणात कांदा मार्केटला येण्यास सुरु वात होताच दरात घसरण झाल्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजेच्या सुमारास कांदा लिलाव सुरू झाले होते. कांदा दरात घसरण सुरू होताच, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्केयांनी शेतकºयांना एकत्र करून कांदा लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी तसेच शेतकºयांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दीपक बर्के, भारत मुंगसे, शरद बर्के, माजी उपसरपंच भारत दराडे, हरिभाऊ मुंगसे, गणपत केदार, संजय शेळके, गणेश शेळके, शशिकांत येरेकर आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कांद्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता आजमितीला हव्या त्या प्रमाणात दर मिळत नाही. कांदा पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. तसेच केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. निर्यातबंदी उठवून निर्यातीसाठी अनुदान दिल्यास कांद्याला उत्पादन खर्चानुसार बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे.
- दीपक बर्के, शेतकरी