नायगावला कांदा लिलाव सहा दिवस सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:52+5:302021-06-18T04:10:52+5:30
------------------- ऑक्सिजन प्लांट १५ दिवसांत कार्यान्वित होणार सिन्नर : जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयासाठी ...
-------------------
ऑक्सिजन प्लांट १५ दिवसांत कार्यान्वित होणार
सिन्नर : जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार असून येत्या दोन-तीन दिवसांत हा प्लांट उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत तो कार्यान्वित होईल अशी माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
----------------------
बँकिंग सेवा प्रशिक्षण उत्साहात
सिन्नर : सीवायडीए आणि युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे वित्तीय समावेशक बँकिंग सेवा तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये सोनिया गारचा यांनी बँकिंग क्षेत्रातील सुविधा, सुरक्षितता, डिजिटल व्यवसायाचे फायदे-तोटे, सायबर क्राईम, सोशल मीडियाचा अतिरेक, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांच्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.
--------------------
गरजू कोरोना बाधितांसाठी कॉन्सन्ट्रेटर मशीन्स
सिन्नर : ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या तालुक्यातील कोविड सेंटर, विलगीकरण सेंटर अथवा घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रकल्प मुंबई संस्था व युवा मित्रने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच लीटर क्षमतेचे सहा तर दहा लीटरचे दोन अशा आठ कॉन्सन्ट्रेटर मशीन्स युवा मित्रच्या लोणारवाडी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तालुक्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेत आरोग्य जपावे, असे आवाहन युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी केले आहे.