निफाड उपबाजारमध्ये कांदा लिलाव सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:31+5:302021-05-25T04:16:31+5:30
सोमवारी ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपबाजाराच्या आवारात औषध फवारणी करण्यात आली होती. कांदा लिलाव सुरू करण्यापूर्वी रविवारी कांदा व्यापारी, ...
सोमवारी ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपबाजाराच्या आवारात औषध फवारणी करण्यात आली होती. कांदा लिलाव सुरू करण्यापूर्वी रविवारी कांदा व्यापारी, उपबाजाराचे कर्मचारी, माथाडी कामगार, कांदा खळ्यावर काम करणारे मदतनीस अशा एकूण १८३ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली होती. सोमवारी कांदा लिलावासाठी जे शेतकरी कांदा घेऊन आले होते, त्यातील काही शेतकऱ्यांनी खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये तर काहींनी प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना येथे रॅपिड चाचणी केलेली होती. अशा शेतकऱ्यांना चाचणी सर्टिफिकेट दाखवल्यानंतर उपबाजारात प्रवेश देण्यात येत होता. सोमवारी सकाळ आणि दुपार सत्रात कांद्याला सरासरी १४०० रुपये भाव मिळाला, तर जास्तीत जास्त १७५१ रुपये भाव मिळाला. सकाळ सत्रात २३० वाहने तर आणि दुपार सत्रात १५८ वाहने अशी एकूण ३८८ वाहने कांदा लिलावासाठी आली होती.