नायगावी दोन सत्रात कांदा लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:38 PM2019-09-05T14:38:03+5:302019-09-05T14:38:13+5:30
सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव उपबाजारात बुधवार (दि. ४) पासून रोजी दोन सत्रांमध्ये कांदा शेतमालाचे लिलाव सुरु करण्यात आले.
सिन्नर : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव उपबाजारात बुधवार (दि. ४) पासून रोजी दोन सत्रांमध्ये कांदा शेतमालाचे लिलाव सुरु करण्यात आले. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने शेतमालाचे लिलाव बाजार समितीचे उपबाजार आवारात दोन सत्रात सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केली जात होती. त्यास प्रतिसाद देवून संचालक मंडळाचे प्रयत्नाने व स्थानिक व्यापारी व बाजार समिती घटकांशी चर्चा करु न सदर निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात एकूण ६८ वाहने कांदा शेतमाल घेवून विक्र ीसाठी आली होती. तर दुपारच्या सत्रात ३० वाहने लिलावासाठी आलेली होती. त्यास जास्तीत जास्त २ हजार ७०० रूपये दर प्रति क्विंटल मिळाला व सरासरी बाजारभाव २ हजार ४५० रूपये राहिले. सर्व शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची रक्कम व्यापाºयांकडून धनादेश, आरटीजीएस, एनईफटीद्वारे वितरीत करण्यात आली. केंद्र शासनाच्या धोरणा नुसार १ सप्टेंबर पासून शेतमाल विक्र ी केलेली रक्कम आॅनलाईन त्यांचे राष्ट्रीयकृत बँक खात्यावर व्यापाºयाकडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी बाजार आवारात आपला शेतमाल विक्रीस आणतांना सोबत आधारकार्ड झेरॉक्स व राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स प्रत (सुस्पष्ट नाव, बॅँकेचा आयएफएससी कोड, खाते क्रमांक) असलेले सोबत आणावी व त्याच प्रमाणे बँक पासबुकावरील नावानेच शेतमाल विक्री करण्याचे आवाहन सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.