सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:17 AM2018-03-26T00:17:35+5:302018-03-26T00:17:35+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव मार्केट सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
नाशिकरोड : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव मार्केट सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सिन्नर फाटा येथील कृषी बाजार समितीच्या उपबाजारात कांदा मार्केट सुरू करण्यासाठी रविवारी बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, संचालक प्रवीण नागरे व विविध ठिकाणच्या कांदा व्यापाºयांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये सिन्नर फाटा उपबाजारात कांदा मार्केट सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी लिलाव जागेची व माल साठवण्याकरिता जागेची व्यापाºयांनी पाहणी केली. कांदा मार्केट सुरू करण्यासाठी लागणाºया सोयी-सुविधा बाजार समितीकडून लवकर उपलब्ध करून देण्याचे तुंगार व नागरे यांनी स्पष्ट केले. शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या उपबाजार आवारात जागा व इतर सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. व्यापारी व शेतकरी यांना यामुळे नवीन मार्केट उपलब्ध होणार आहे. या बैठकीला लालूशेठ दळवी, सुनील गवळी, भरत उगले, युवराज कदम, विकास बरके आदींसह अकोला, लासलगाव, विंचूर दळवी, नांदूर शिंगोटे आदी ठिकाणचे कांदा व्यापारी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे लालूदास तुंगार, बाळासाहेब पोवळे, अशोक पाळदे, बनाजी वाकचौरे आदी कर्मचारी उपस्थित होते.