कांदाचाळ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:52 PM2018-05-24T23:52:05+5:302018-05-24T23:52:05+5:30
खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील कसमादे भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. यात शेतकºयाला हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेस बºयाचदा कांद्याचे भाव कोसळतात, तेव्हा शेतकºयाला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतो. अशा वेळेस शेतकºयाला उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही. किंवा ज्या वेळेस उन्हाळी कांद्याला चढता भाव मिळतो. त्या वेळेस शेतकºयाकडे कांदा नसतो. तेव्हा शेतकºयाला फायदा होत नाही. उधारीने कांदा चाळी उभारण्यात आल्या तरी अनुदानास पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा
आता हात उसनवार किंवा व्यापाºयाकडून उधारी कसे परत कारावे याची चिंता शेतकºयाला पडली आहे.