लासलगावला बुधवारपासून कांद्याचे पैसे रोखीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:03 AM2019-11-10T01:03:54+5:302019-11-10T01:04:19+5:30
लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
४ सप्टेंबरपासून शेतकºयांना शेतमालाचे पैसे एनईएफटीद्वारे देण्याचा निर्णय झाला होता. मात्र शेतकºयांना यामध्ये अडचणी येत असल्याने बाजार समितीने केंद्राशी संपर्क केला होता. यामुळे केंद्र शासनाने दि. २० सप्टेंबरपासून व्यापाºयांनी शेतकºयांना शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यासाठी बँकेतून काढल्यास त्यावर २ टक्के उद्गमकर (टीडीएस) लागणार नसल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे शुक्र वार, दि. ८ रोजी बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक होऊन लासलगाव मुख्य बाजार आवारावर कांदा विक्री करणाºया शेतकºयांना त्यांची रक्कम बुधवार, दि. १३ पासून दुकानातच रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, मनोज रेदासनी, प्रफुल्लकुमार भंडारी, हेमंत राका, ओमप्रकाश डागा, लक्ष्मण जगताप, राजमल मुनोत, अनिल आबड, सूर्यकांत बोडके, विलास देवरे, अनिल बांगर, राजेश माठा, नाना सूर्यवंशी, रोशन माठा, संदीप गोमासे, सागर थोरात, सहा. सचिव सुदीन टर्ले, अशोक गायकवाड, पंकज होळकर, दिलीप देसाई यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.