नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:20 AM2018-02-27T00:20:54+5:302018-02-27T00:20:54+5:30

दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवली आहे. याचवेळी वजनकाट्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.

Onion, cereal auction today at Nandgaon | नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव

नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव

Next

नांदगाव : दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवली आहे. याचवेळी वजनकाट्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.
वजनकाटाविरोधात व्यापारी वर्गाने आज लिलाव बंद ठेवले होते. व्यापारी वर्गाच्या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी वर्गाच्या हुकूमशाहीचा निषेध करून त्यांचे परवाने रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. समितीचे सभापती तेज कवडे व माजी सभापती विलास आहेर यांनी यशस्वीपणे बाजार समितीच्या वजनकाट्याचा मुद्दा चर्चेत लढवला. वाहनाचे वजन बाजार समितीच्या काट्यावर केल्यानंतर व्यापाºयांच्या काट्यावर पुन: करण्यात येईल. त्यात १० किलोपेक्षा अधिक तफावत आढळली तर पुन: वजन करून खात्री करण्यात येईल. तसेच अधिक फरक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान परवाने निलंबित करण्याच्या व्यापारी वर्गाला दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या वजनकाट्यावर मोजलेल्या वाहनासाठी बाजार समितीस १० रुपये व व्यापारी वजनकाटा १५ रुपयांचे शुल्क आकारले जाईल असे निर्णय यावेळी घेण्यात आले. शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, विशाल वडघुले व अशोक जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
वजन संशयाच्या भोवºयात
समितीमध्ये २९ खरेदीदार व्यापारी नोंदणीकृत असून, ११ जणांकडे स्वत:चे वजनकाटे आहेत. त्यावरील वजन अनेकदा संशयाच्या भोवºयात अडकून वादाचे प्रसंग निर्माण होतात. म्हणून समितीने स्वमालकीचा काटा घेतला. वजनाबद्दल शंका असल्यास व्यापारी स्वत:च्या काट्यावर पुन: मोजमाप करू शकतील; मात्र त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशी अट समितीने घातल्याने व्यापारी नाराज झाले. त्यांनी एकीचा एल्गार करत समितीच्या निर्णय धुडकावून लावला.

Web Title: Onion, cereal auction today at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.