सटाणा येथे कांद्याला अवघा ४० पैसे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:39 AM2018-12-28T00:39:51+5:302018-12-28T00:40:20+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यात कांद्याला गुरुवारी किलोला अवघा ४० पैसे भाव मिळाल्यामुळे संतप्त उत्पादकांनी कांदा ट्रॉली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्यावर आडव्या लावून वाहतूक रोखून धरली. शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली. तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Onion costs 40 paisa at Satana | सटाणा येथे कांद्याला अवघा ४० पैसे भाव

सटाणा येथे कांद्याला अवघा ४० पैसे भाव

Next
ठळक मुद्देउत्पादक संतप्त : महामार्गावर रास्ता रोको

सटाणा : बागलाण तालुक्यात कांद्याला गुरुवारी किलोला अवघा ४० पैसे भाव मिळाल्यामुळे संतप्त उत्पादकांनी कांदा ट्रॉली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्यावर आडव्या लावून वाहतूक रोखून धरली. शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली. तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गुरु वारी कांद्याला ३० ते ४० पैसे प्रतिकिलो असा दर मिळाल्याने शेतकºयांनी ट्रॅक्टर ट्रॉली महामार्गावर आडव्या लावून वाहतूक रोखून धरली. तहसीलदार प्रमोद हिले यांनी शेतकºयांशी चर्चा केली. यावेळी संतप्त शेतकºयांनी दोनशे रु पये अनुदानाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच कांद्याचे शेतातच मोजमाप करून प्रतिक्विंटल अनुदान शेतातच द्यावे, अशीही मागणी केली. त्यामुळे जुन्या मालाची आवक थांबून नवीन मालाच्या दरात तरी सुधारणा होईल असा पर्याय शेतकरी संघटनेचे संजय वाघ शिरसमणीकर व गुरुदास सोनवणे यांनी सुचविला. याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यात दिवसाआड आंदोलने होत असून, दोनशे रु पये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर झाल्यानंतरही उत्पादकांचा रोष कमी झालेला नाही.

Web Title: Onion costs 40 paisa at Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा