कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:58 PM2020-05-24T22:58:23+5:302020-05-24T22:59:33+5:30

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

Onion-cotton crop insurance compensation in eight days | कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

Next
ठळक मुद्देदादा भुसे : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची मागणी

मालेगाव : शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.
गतवर्षी जानेवारी ते जूनपर्यंत भयानक दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. सुरुवातीला सर्व पिके जोमात असताना सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे बाजरी, कांदा, मका व इतर सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले. नदी काठावरील गावांमधील पिके अक्षरश: वाहून गेली. यात मुख्यत: मका, कांदा, डाळिंब, ऊस, द्राक्ष या नगदी पिकांचा समावेश होता.
शासनाने व कृषी खात्याने लागवडनंतर उपरोक्त पिकांचे संरक्षण म्हणून पिकविमा काढण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे शेतकºयांनी पीकविमा उतरवला होता, तसेच बँकांनीदेखील कर्जदार शेतकºयांना कर्ज हप्ता पीक विमा रक्कमेसह भरून घेतला होता. सर्व पिके जोमात असताना सतत दोन महिने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्व पिके वाया गेली होती. नियमानुसार शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरले होते. नुकसानीनंतर कृषी व महसूल खाते तसेच विमा कंपन्यांने रीतसर पंचनामेही केले होते. मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा व इतर तालुक्यांतील डाळिंंब, कांदा व इतर फळ उत्पादक शेतकºयांनी पीकविमा प्रतिहेक्टरी ठरवून दिल्याप्रमाणे रक्कमेचा रोख भरणा केलेला होता. परंतु पीकविम्याचे नियमित हप्ते भरूनही विमा कंपन्यांनी शेतकºयांना नुकसानभरपाईची मदत न करता वाºयावर सोडून दिले आहे. काही ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हवामान खात्याच्या चुकीच्या नोंदी दाखवत त्या तारखांना पाऊस कमी पडला होता, असे दाखवून शेतकºयांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पीकविमाधारक शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, प्रा. के. एन. आहिरे, देवा पाटील, शेखर पवार, कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाठ, उदय राहुडे, दुर्गेश देवरे आदींनी केली आहे.
शासनातर्फे पीकविमा भरपाई तत्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार धान्य उत्पादक शेतकºयांना पीकविमा भरपाई अदा करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघा १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. शेतकºयांना येणाºया हंगामाच्या आत जर
पीकविमा भरपाई मिळाली तर पुढील हंगामासाठी थोडेफार भांडवल उपलब्ध होईल.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे मार्च महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातील शेतमालाला बाजारपेठ मिळू शकली नाही. दर प्रचंड कोसळले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयाला मदतीचा हात देण्यासाठी तत्काळ पीकविमा भरपाई देणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Onion-cotton crop insurance compensation in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.