धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:40 PM2020-12-17T17:40:20+5:302020-12-17T17:41:03+5:30

जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

Onion crop rot due to fog | धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देउत्पादक चिंतित: उत्पादन घटण्याची शक्यता

सध्या उन्हाळ कांदा लागवडीला सुरुवात झाली असून जळगाव नेऊर परिसरात तीन महिन्यांपासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तसेच दररोज पडणारे दव आणि धुके,पाऊस यामुळे कांदा जमिनीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच लाल कांदा रोपे जमिनीतच सडल्याने व लागवड केलेला कांदाही दुषीत हवामानामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सापडल्याने उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळ कांदा व लाल कांदा बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झशले आहेत. परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांची सुरू झालेली साडेसाती अजूनही पाठ सोडायला तयार नसून आठ पंधरा दिवसातुन खराब होणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिक कष्टदायक होत चालले आहे.यावर्षी पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्रमी कांदा लागवड होणार असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महागडी बियाणे उपलब्ध करुन रोपे तयार केल्याने कांदा लागवडीला मजुरांची टंचाई भासत आहे.

Web Title: Onion crop rot due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.