ढगाळ वातावरणामूळे कांदा पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:44 PM2019-11-19T15:44:41+5:302019-11-19T15:44:50+5:30
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत.आतापर्यंत कांद्याला रोप टाकण्यापासून ते लागवडपर्यंत एक एकरासाठी तीस हजार रु पये खर्च झालेला आहे.त्यात आता ढगाळ हवामान बदला मळे पून्हा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागे टाकलेली रोपे संपूर्ण खराब झाल्याने कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.आतापर्यंत शेतकºयांनी टाकलेल्या कांद्याच्या रोपात जेथे एक पायलीच्या रोपात दीड ते दोन एकर लागवड होती.पण त्याच रोपांची लागवड फक्त दहा गूठे अशी होत आहे. विकत आणून टाकलेले उळे खराब होऊन गेल्याने कांदा लागवड क्षेञात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कांदा लागवडीसाठी रोपाचा तूटवडा झाला आहे . शेतकरी आता रब्बीच्या पिकाच्या गव्हू, हरभरा , पेरण्या करीत आहे.
(१९राजापूर१).(१९राजापूर २).