मालेगाव तालुक्यात कांदा लागवड वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:37+5:302020-12-29T04:12:37+5:30

---- ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा मालेगाव : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ...

Onion cultivation is fast in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात कांदा लागवड वेगात

मालेगाव तालुक्यात कांदा लागवड वेगात

Next

----

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा

मालेगाव : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तहसील कचेरीसमोर गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

-----------------

देवदर्शनासाठी वाढली गर्दी

मालेगाव : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी चंदनपुरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम केले असून, यात तळी भरणे, गोंधळ, जागरण यांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी समर्थक कार्यकर्त्यांसह चंदनपुरीसह विविध धार्मिकस्थळांना अर्ज भरण्यापूर्वी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

----

बँकेच्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील बॅंक ऑफ बडोदा येथे सुरक्षारक्षकाने त्याच्याजवळील स्प्रे फवारून लोकांना दुखापत केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तन्वीर अहमद नुरूल हुदा रा. इस्लामनगर यांनी तक्रार दाखल केली. गेल्या गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. सुरक्षारक्षक अहिरे याने स्प्रे फवारल्याने लाेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काहींना खोकला व जळजळीचा त्रास झाला.

Web Title: Onion cultivation is fast in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.