येवला तालुक्यात मजुरांअभावी कांदा लागवडीचा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:18+5:302021-01-17T04:13:18+5:30
पालखेड डावा कालव्याचा आधार : १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार कांदा लागवड जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मजुरांअभावी कांदा लागवडीचा कालावधी ...
पालखेड डावा कालव्याचा आधार : १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार कांदा लागवड
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मजुरांअभावी कांदा लागवडीचा कालावधी वाढला असून, मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून मजूर गोळा करून कांदा लागवड करत आहे.
परतीच्या पावसाने मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे कांदारोप सडल्याने व पर्यायाने उशिराने कांदा बियाणे टाकल्याने, कांदा लागवडीचा कालावधी वाढून जानेवारी महिना अर्ध्याच्या वर संपला, तरी शेतकऱ्यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. मजुरांअभावी १५ फेब्रुवारीपर्यंत कांदा लागवड चालणार असल्याने मजुरांकडे आजही एक महिन्याची लागवड बुकिंग आहे. अजून एक महिना कांदा लागवड सुरू राहणार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची रोपे लागवडीसाठी आलेली असतानाही व अडीच ते तीन महिन्यांची रोपे झालेली असतानाही मजूर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाहेरगावावरून मजूर आणून कांदा लागवड केली आहे. आठ-पंधरा दिवसातून येणारा पाऊस, ढगाळ वातावरण, धुके यामुळे रोपे खराब होत आहेत. कांदा लागवडीसाठी, काढण्यासाठी, विक्री करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने लागवडीचा कालावधी वाढत चाललेला आहे.
----------
पालखेड डावा कालव्याचा आधार
मजुरांअभावी कांदा लागवडी उशिरा होत असल्या, तरी पालखेड डावा कालव्याचे रब्बी सिंचनासाठी दोन आवर्तन आहे. त्याचा आधार उशिरा होत असलेल्या कांदा लागवडीला होणार आहे. सहाजिकच पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
-------------
उत्पादन कमी, भांडवलाची चिंता
उन्हाळी कांद्यापाठोपाठ लाल कांद्याचे उत्पादन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना अडीच हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. परंतु यावर्षी रोगट हवामानाने कांदा मोठा झाला नसल्याने उत्पादन कमी निघत आहे. मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने उन्हाळी कांद्याला भांडवलाची चिंता भेडसावत आहे .
--------------
कांद्याचे रोप खराब होऊ लागल्याने व मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने निफाड तालुक्यातून कांदा लागवडीसाठी पिकअप गाडीने ने -आण करून उन्हाळी कांदा लागवड केली. त्यामुळे खर्चातही वाढ झाली, परंतु रोपे खराब होत असल्याने पर्यायाने चार पैसे अधिक देऊन कांदा लागवड करावी लागली.
- गोकुळ दराडे, कांदा उत्पादक
-----------
जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली कांदा लागवड. (१६ जळगाव नेऊर)
===Photopath===
160121\16nsk_19_16012021_13.jpg
===Caption===
१६ जळगाव नेऊर