खामखेडा परिसरात कांदा लागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:28 PM2019-12-14T18:28:47+5:302019-12-14T18:29:26+5:30

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.

Onion cultivation in Khamkheda area | खामखेडा परिसरात कांदा लागवडीची लगबग

खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवडीची लगबग.

Next
ठळक मुद्दे गावात मजुर उपलब्ध होत नाही.

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.
दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. उन्हाळी कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर मिहन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन सुरवात केली जाते. ती नोहेंबर ते साधारण पंधरा डिसेंबर पर्यत केली जाते.
परंतु मघ्यंतरी झालेल्या जोरदार अवकाळी पाऊसामुळे टाकलेली उन्हाळी कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्याला दोन वेळेस कांद्याचे कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने या वर्षी उन्हाळी कांद्याची लागवड उशिरा होत आहे.
यामुळे आता सर्वत्र एकाच वेळेस कांदे लागवड सुरवात झाल्याने आता शिवारात सर्वत्र कांदा लागवड दिसून येत आहे.पूर्वी सहज कामासाठी मजूर मिळत असे. कारण पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुर उपलब्ध होत नाही.
आता सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडचा मौसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकºयाला मजुरासाठी वनवण करीत भटकावे लागत आहे.  तेव्हा बाहेर गावाहुन मजूर आणावे लागत आहे.

Web Title: Onion cultivation in Khamkheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.