कवडदरा परिसरात कांदा लागवडीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:24 PM2020-01-08T22:24:57+5:302020-01-08T22:25:11+5:30
इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव परिसरात कांदा लागवडीस वेग आला असला ्रअसून, मजुरांची टंचाई जाणवत आहे.
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव परिसरात कांदा लागवडीस वेग आला असला ्रअसून, मजुरांची टंचाई जाणवत आहे.
सद्यस्थितीत कांद्याचे दर टिकून असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. लागवडीला एक आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. लागवड महिनाभर सुरू राहील. कांदा लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या, तर काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे खरेदी करून लागवड करणे पसंत केले आहे. रोपवाटिकांचे दरही यंदा अधिक असून, अडीच फूट बाय ३० फुटाच्या वाफ्यातील रोपांचे दर तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. एका वाफ्यात अर्धा एकरात कांदा लागवड करणे शक्य होत आहे. धामणगाव, शेणीत या भागातही कांदा लागवड सुरू आहे. यंदा पाणी मुबलक असल्याने लागवड अधिक होईल. लागवडीसाठी विविध गावांमध्ये महिला मजुरांचे गट असून, या मजुरांकरवी शेतकरी लागवड उरकून घेत आहेत. एकरी सहा हजार रु पये मजुरी दिली जात आहे. तसेच मजुरांना शेतापर्यंत आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही शेतकºयांना द्यावा लागत आहे, असे कांदा उत्पादक शेतकºयांनी सांगितले.