उमराणे बाजार समितीत कांदा आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:05 AM2019-10-10T01:05:06+5:302019-10-10T01:05:29+5:30
उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दर वाढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली की कांदा संपला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी दसºयानंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परिणामी चालू वर्षी दसºयाला लाल पावसाळी कांद्याची किती आवक होते याबाबत उन्हाळ कांदा साठवणूकदारांमध्ये उत्सुकता लागून होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दर वाढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली की कांदा संपला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी दसºयानंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परिणामी चालू वर्षी दसºयाला लाल पावसाळी कांद्याची किती आवक होते याबाबत उन्हाळ कांदा साठवणूकदारांमध्ये उत्सुकता लागून होती. दसºयाला लाल कांद्याची आवक नगण्य असल्याने व आगामी काळात लाल कांद्याची आवक वाढेल अशी शक्यताही नाही. त्यातच पाच हजारी गाठलेल्या उन्हाळी कांद्याना सद्यस्थितीत मनासारखा भाव नसल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकºयांनी माल विक्र ी थांबविली असल्याचा अनुमान असला तरी साठवणूक केलेला कांदाही अल्प प्रमाणात शिल्लक राहिल्याने व दरही चार हजाराच्या आतच असल्याने बाजारात उन्हाळी कांद्याची
आवक घटल्याचे जाणकारांनी सांगितले.
बुधवारी (दि.९) बाजार समितीत सातशे वाहनांमधून सुमारे अकरा हजार क्विंटल आवक झाली. भाव कमीतकमी १५५१ रु पये, जास्तीत जास्त ३८६५ रु पये तर सरासरी ३३०० रु पये असा दर मिळाला.